उखळ-मुसळ
उखळ - मुसळ | |
पूर्वीच्या काळी उखळ हे धान्य साधण्यासाठी वापरात असत . वरील छायाचित्रात दाखवल्याप्रमाणे उखळ हे दगडापासून बनवलेले असायचे . या उखळामध्ये धान्य टाकून ते मुसळाच्या साहाय्याने सोडले जायचे. मुसळ म्हणजे लाकडाचा दांडा असायचा. पूर्वी घरातील बायका दुपारच्यावेळी बेगमीची कामे करत असत. चटण्या, पापड, पापड्या, कुरडया इत्यादी गोष्टी घरीच केल्या जात. एकदम वर्षभराचे धान्य घेतले जाई. त्याची वास्तपुस्त करणे, ते वाळवणे, निवडणे, भरून ठेवणे इत्यादी गोष्टी चार चौघीजणी एकत्र बसून हसत-खेळत, गप्पा गोष्टी करत, करत असत. तसेच दुस-या दिवशीच्या स्वयंपाकाची तयारी केली जात असे. उखळ, धान्य सडण्यासाठी वापरले जात असे. गव्हाच्या खिरीचे गहू यात सडले जात. चटणीसाठी दाणे दगडी उखळात कुटत असत. त्या कुटलेल्या दण्याच्या चटणीची चव व मिक्सरमधल्या चटणीची चव यात फरक आहे. उखळातली चटणी चविष्ट लागते. उखळाचे बरेच प्रकार आहेत. जमिनीत पुरलेले उखळ, आणि एक जमिनीच्या वर उभे उखळ असे. त्याला उखळी म्हणत. जमिनीत पुरलेले उखळ तांदूळ सडण्यासाठी वापरले जात असे. एकत्र कुटुंबामुळे जे काय करायचे ते जास्तप्रमाणात करावे लागे. त्यामुळे उखळ मुसळ पण ब-यापैकी मोठे असे. |
Comments
Post a Comment